Share

‘या’ बँकांमध्ये पैसे जमा करण्यास येऊ शकतात अडचणी; जाणून घ्या नवे नियम 

Published On: 

मुंबई : बँकिंग क्षेत्रात रोज नवनवीन बदल होत असतात यामध्ये ऑनलाईन बँकिंग मुळे तर अमुलाग्र बदल झाले आहेत. काही बँकांनी IFSC कोडही बदलले आहेत. यामुळे बँकेकडून नवीन आयएफएससी कोड जारी करण्यात आले आहेत. आजपासून अनेक बँकांचे IFSC कोड बदलले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करताना, अडचणी येऊ शकतात.

बँका आपल्या ग्राहकांना IFSC नंबरची सातत्याने माहिती देत असते. त्यामुळे ग्राहकांनी जागरुक राहून IFSC कोड अपडेट करावा.  कारण आता तुम्ही जुना कोड वापरू शकणार नाही. १ जुलैपासून तुमचे जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत. यामुळे पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. काही बँक दुसऱ्या बँकांत विलीन होत असल्याने IFSC बदलाचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो.

देशातील देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनाएटेड बँक ऑफ इंडिया (UBI), सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉरपोरेशन बँक आणि इलाहाबाद बँक या बँकांचं दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण झालं आहे.

या बँकांचे झाले विलिनीकरण-  

  • देना बँक आणि विजया बँकेचं विलीनकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आहे.
  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायडेट बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झालं आहे.
  • आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेचं विलिनीकर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालं आहे.
  • इलाहाबाद बँक इंडियन बँकेत तर सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत विलीन झाली आहे.

असे घ्या जाणून IFSC Code

  • तुम्ही ब्रँचमध्ये जाऊन नवीन IFSC Code माहित करू शकता.
  • बँकेकडून पाठवण्यात आलेलं लेटर किंवा एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्ही नवीन कोड माहित करून घेऊ शकता.
  • तुम्ही बँकेच्या ऑफिशिअल लिंकच्या माध्यमातून आयएफएससी कोडबाबत माहिती करून घेऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!