🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसापासुन बीसीसीआय भारताच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघात भेदभाव करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. इंग्लंड दौऱ्याबाबत जे आरोप करण्यात आले त्यावर महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी पुढे येत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी १९ मे रोजी महिला क्रिकेटपटुच्या वार्षिक करार जाहीर होताच पुन्हा या चर्चाना उत आला आहे.
महिला क्रिकेटपटुच्या वार्षिक करारातील गट ए मधील खेळाडूंना ५० लाख रुपये मिळतात तर पुरुष खेळाडूंच्या करारात गट ए मधील खेळाडूंना ७ कोटी इतके मानधन मिळते. या फरकावर अनेक स्तरातुन टिका होती आहे. बीसीसीआय महिला आणि पुरुष क्रिकेटपटुमध्ये भेदभाव करत आहे असा आरोप होत आहे. आता या प्रकरणात महिला संघातील खेळाडू स्मिती मंधानाने मत व्यक्त केले आहे. स्म्रिती म्हणते की,’बीसीसीआयची कमाई ही केवळ पुरुष क्रिकेट संघाच्या सामन्यातून होत असते. मुळात आम्हाला जे मानधन मिळत आहे. तेपण त्यांच्या सामन्यातील कमाईतुन होते.’ असे म्हणाली.
NEWS: BCCI announces Annual Player Contracts for #TeamIndia (Senior Women) for the period from October 2020 to September 2021.
Details ???? https://t.co/jJKSarT8xn pic.twitter.com/suSJUkm2zw
— BCCI Women (@BCCIWomen) May 19, 2021
पुढे बोलताना स्म्रिती असेही म्हणाली की, ‘ज्यादिवशी महिला क्रिकेट सामन्याद्वारे बीसीसीआयला कमाई सुरु होईल त्यादिवशी महिला क्रिकेटपटुच्या करारात पुरुषाप्रमाणे आम्हाला समान हक्क मिळेल. पण सध्या आम्ही त्यांच्या मानधनाशी आमच्या मानधनाशी तुलना करणे चुकीचे ठरेल.’ बीसीसीआयच्या करारात पुरुष संघातील मानधन हे कोटी रुपयात आहे, मात्र महिला क्रिकेटपटुंना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम ही लाखात आहे. महिला क्रिकेटपटुंच्या सर्व सदस्यांच्या मानधनाची एकुण रक्कम ही ५.१० कोटी आहे. तर एकट्या विराट कोहलीचे मानधन हे ७ कोटी आहे
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारने घालून दिलेले सगळे नियम पाळतो पण 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्या’
- मुहुर्त सापडला! आयपीएल २०२१ स्पर्धेची तारिख ठरली
- हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीचे अनोखं फोटोशुट पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया
- ‘खूप कमी माणसं असतात ज्यांच्या बरोबर तुम्ही मनमोकळ हसू शकता’; स्वप्नीलने शेअर केला सुंदर व्हिडीओ
- खुनाच्या आरोपाखाली फरार कुस्तीपटू सुशील कुमारला अखेर दिल्ली पोलीसांनी ठोकल्या बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
