🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडी कोठडीत आहेत. मात्र अजूनही त्यांचा राजीनामा मविआ सरकारने घेतलेला नाहीये. यावरूनच भाजपने आक्रमक भूमिका घेत मलिकांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दाखला देत टीका केली होती. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे.
“पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात त्याची हमखास विकेट जाते हा इतिहास आहे.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात…..
त्याची हमखास विकेट जाते हा इतिहास आहे. pic.twitter.com/4byiSSytW3
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 7, 2022
काय म्हणाले होते शरद पवार?
“नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली २० वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार समजलं जातं. कारण नसताना आरोप केले जातात. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते.”, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
तसेच “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. म्हणजे एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे.”, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- कर्णधार रोहित शर्माचे जडेजाबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला मी त्याला…
- खरीपात भासणार खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहणार!
- हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत चालणार ‘या’ दिवशी- नितीन गडकरी
- नारायण राणे ‘आधीश’ बंगल्यामुळे अडचणीत; BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस
- जनरल व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्यावर राऊतांचे टीकास्त्र; म्हणाले, “सध्या मंगळावरचे राहू द्या…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
