नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोहालीत ज्या प्रकारे खेळी केली. ते पाहून त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. त्यातच भारताचा कर्णधार रोहित शर्माने जडेजाबद्दल काय रणनीती आखली होती. त्याबद्दल कर्णधार रोहित शर्माने एक मोठे वक्तव्य केले आहे.
“रोहित म्हणाला की एक कर्णधार म्हणून जडेजाला मी फलंदाजीत जास्त संधी देणार आहे. सगळ्यांना त्याच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणची काय ताकद आहे हे माहितेय. माझ्यासाठी तो एक सर्वात मोठा अष्टपैलू आहे. या अगोदरही त्याने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. तो दिवसेंदिवस आपल्या खेळीत बदल करत आहे. तो जास्त धावा करून संघासाठी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत करतोय. एका सामन्यात १७५ धावा आणि ९ विकेट्स घेणे सोपे नाही.”
रवींद्र रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने या सामन्यात नाबाद १७५ धावांची खेळी केली. जर भारताने डाव घोषित नसता केला तर जडेजाने द्विशतक केले असते. त्याने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात एकूण ९ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

