मुंबई: भारताचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने वैयक्तिक संभाषणात धमकी देणाऱ्या पत्रकाराशी केलेल्या संवादाचे तपशील उघड केले आहेत आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियुक्त केलेल्या ३ सदस्यीय समितीच्या भेटीदरम्यान त्या व्यक्तीचे नाव देखील उघड केले आहे. ज्यात बीसीसीआयने नावाची सार्वजनिक घोषणा करण्याआधीच त्या पत्रकाराने स्वतः समोर येत स्पष्टीकरण दिले आहे. साहाला धमकी देणारा पत्रकार बोरिया मजुमदार असल्याचे समोर आले आहे.
शनिवारी बीसीसीआय (BCCI) बैठक झाल्यानंतर साहाने (Wriddhiman saha) त्याला मिळालेल्या धमकी प्रकरणात मजुमदार दोषी असल्याचे सांगितले. मात्र बीसीसीआयाने त्याच्या नावाबद्दल कोणतीही घोषणा करण्याआधी खुद्द बोरीया मजुमदार (boria majumdar) यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली कोणतीही चूक नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. साहाने धमकीचे फोटो टाकल्यानंतर क्रिकेट रसिकांनी मेसेजच्या आधारे पत्रकार मजुमदारच असल्याचे सांगितले होते. आता त्यांच्या नावाची पुष्टी देखील झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रिद्धिमान साहाची भारतीय संघात निवड झाली नव्हती. याच गोष्टीबद्दल बोलण्यासाठी बोरिया मजुमदार यांनी साहाला मुलाखत देण्यास सांगितले. मजुमदार यांच्या मेसेजला साहाने प्रतिउत्तर न दिल्याने मजुमदार यांनी साहा ला धमकीचे मेसेज केले. साहाने त्या मेसेजचे स्क्रिनशॉट ट्विटरवर पोस्ट करत जगाला त्याच्या सोबत घडलेल्या या घटनेबाबत सांगितले. या सर्व प्रकरणात बीसीसीआयने समिती नेमत चौकशी केली. तथापि , बोरिया यांनी स्वतःच आपले नाव जगाला सांगत साहा खोटं बोलत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बीसीसीआय या सर्व प्रकरणावर कोणती कारवाई करेल यावर अजूनही प्रश्न चिन्ह आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्णधार रोहित शर्माचे जडेजाबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला मी त्याला…
- खरीपात भासणार खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहणार!
- हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत चालणार ‘या’ दिवशी- नितीन गडकरी
- नारायण राणे ‘आधीश’ बंगल्यामुळे अडचणीत; BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस
- जनरल व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्यावर राऊतांचे टीकास्त्र; म्हणाले, “सध्या मंगळावरचे राहू द्या…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

