सिंधुदुर्ग : गेले काही महिने राज्यात ईडीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपातील नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी देखील राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ‘संजय राऊत फक्त बडबड करतात. मग जाऊदेना त्यांना ईडी समोर. भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकार अंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे. ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नाही’ असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘राऊतांनी पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता आता किती कोटीची आहे? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचं, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस दिली. असंच कोणाला ईडी वैगेरे नोटीस देत नाही’ असा घणाघात देखील नारायण राणे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली आहे. ‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मी तोंड उघडलं तर केंद्रातील सरकारला हादरा बसेल. राज्यातील सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल,’ असा निर्वाणीचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, उगाच कांगावा कशाला करताय?’
- ‘धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा!’
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- नव्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तोडले जिओचे टॉवर
- राजकीय दुकानदारी बंद होण्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचा कृषी कायद्यांना विरोध- फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

