Share

भेटवस्तू द्यायला आलेला सांताक्लॉज निघाला कोरोनाबाधित

Published On: 

बेल्जियम : कोरोनाचं सावट असलं तरीही देशभरात नाताळ हा सण आनंदाने साजरा झाला. कोरोनाचे सर्व नियम पाळत जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र बेल्जियम मध्ये एका घटनेमुळे या सणाला, उत्साहाला गालबोट लागले आहे.

दरम्यान,बेल्जियममध्ये सांताक्लॉजचे गिफ्ट खऱ्या अर्थान महागात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेल्जियममध्ये मागील आठवड्यात एका होम केअर सेंटरमध्ये ही घटना घडल्याची बाब समोर आली. ख्रिसमस पार्टीनंतर इथे असणाऱ्या अनेकांनाच कोरोनाची लक्षणं दिसून आली आणि त्यांच्या चाचणीचे अहवालही पॉझिटीव्ह आले.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी सांताक्लॉज आपल्या काही सहकाऱ्यांसह बेल्जियमच्या एन्टवर्प केअर होममध्ये आला होता. सांताक्लॉज आणि त्याचे सहकारी आलेले पाहून केअर होममधील सगळ्यानाच आनंद झाला. त्यांनी सांताक्लॉजसोबत सण साजरा केला.

मात्र, तो कोरोना संक्रमित असल्याने केअर होममधील 121 जणांना आणि 36 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बेल्जियममध्ये उघडकीस आली आहे. ‘डेली मेल’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!