कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘दीदी’ या स्वत:ला देशाच्या संविधानापेक्षा मोठ्या समजत आहेत. इतकेच नाही, तर केंद्रीय दल आणि लष्करालादेखील बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात असल्याचा आरोप मोदींनी केला. २ मे रोजी पश्चिम बंगालची जनता स्वत: ममतांना बाहेरचा रस्ता दाखवेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
आसनसोल येथील प्रचार सभेत बोलताना मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात तृणमूल काँग्रेस पक्ष पूर्णपणे गारद झाला आहे. येत्या २ मे रोजी राज्याची जनता ममतांच्या हाती ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणून प्रमाणपत्र देईल. यावेळी मोदींनी केंद्र सरकारच्या अनेक बैठकीला ममता बॅनर्जी सातत्याने दांडी मारत असल्याचा मुद्दादेखील उपस्थित केला.
‘ममता अहंकाराने आंधळ्या झाल्या आहेत. त्यांना आपल्यासमोर प्रत्येक जण लहान वाटत आहे. केंद्र सरकारने अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवर बैठका बोलवल्या; पण कोणते ना कोणते कारण देत ममतांनी बैठकांपासून पळ काढला. कोरोना महामारीसंदर्भातील गत दोन बैठकींनादेखील त्या हजर नव्हत्या. नीती आयोग आणि गंगा नदीच्या स्वच्छतेसंबंधीच्या बैठकीलादेखील त्या गैरहजर राहिल्या. एक-दोन वेळेस उपस्थित न राहणे समजू शकतो; पण त्यांनी ही पद्धतच बनवली असून बंगालच्या लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही’, अशी टीका करत मोदींनी ममतांचा पराभव अटळ असल्याचा दावा केला.
महत्वाच्या बातम्या
- पोषणाविषयी जनजागृतीसाठी ‘आहार क्रांती’ अभियान, केंद्राचा नवा उपक्रम
- “स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
- लातूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार कोरोना चाचणी
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

