नवी दिल्ली : पोषणविषयक जनजागृतीसाठी केंद्र सरकारने एक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन होत असलेले पौष्टिक अन्न, फळे आणि भाजीपाला या सर्वांसाठी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी समर्पित ‘आहार क्रांती’ या अभियानाचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नुकताच केला.
विज्ञान भारती, ‘ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स फोरम’, विज्ञान प्रसार आणि अनिवासी भारतीय शैक्षणिक व वैज्ञानिक संपर्क यांनी संयुक्तरित्या ‘आहार क्रांती’ अभियान सुरू केले आहे. ‘उत्तम आहार-उत्तम विचार’ हे याचे बोधवाक्य आहे. भारत आणि जगात इतरत्र भेडसावणारी उपासमारीची समस्या आणि त्यासोबत येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणून ‘आहार क्रांती’ चळवळ सुरू करण्यात आली आहे.
एका अभ्यासानुसार भारतात जितक्या कॅलरीजचे ग्रहण केले जाते, त्यापेक्षा जवळजवळ दुप्पट उत्पादन होते. तरीही देशातील बरेच लोक अद्यापि कुपोषित आहेत. या विसंगतीचे मूळ कारण पोषणाबाबत जागरूकतेचा अभाव हे आहे. भारतातील पारंपरिक आहारसमृद्ध आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण असून त्याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून समस्येवर मात करणे, हे अभियानाचे उद्दिष्ट आहे.
हे स्थानिक पातळीवरील मोसमी फळे आणि भाज्यांमधील पौष्टिक संतुलित आहाराबाबत दृष्टिकोनात नव्याने बदल हे अभियान घडवेल. ‘देश आज कोविड १९ सारख्या साथीच्या संकटाचा सामना करत असताना साथीचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने संतुलित आहार हे एक महत्त्वाचे साधन आहे, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- “स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
- लातूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार कोरोना चाचणी
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
- इंग्लंडला जाण्याआधी राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला दिला भावुक निरोप !


