मुंबई : हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त सामनातून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते . त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले’, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
”बाळासाहेबांनी जातीविरहीत राजकारण केलं. त्यांनी एकात्मतेची माळ जपली. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,’ असं ते म्हणायचे तेव्हा एक आवाज उफाळून यायचा. न्यायालयात धर्म, जात विचारून जे धर्म ग्रंथ दाखवले जातात ते बाजूला काढा असे ते म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्याची साक्ष घ्या, असे त्यांचे मत होते. धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते
भाजप जातीयवादी पक्ष आहे. ज्यांच्या पोटात आणि ओठात जातीय वाद आहे. दांभिक कोण आणि खरे कोण हे लोकांना कळतं, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. ‘नको त्या माणसाला किंमत द्यायची गरज नाही’, असं अरविंद सावंत कंगना रनौतच्या वक्तव्यावर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- काही तरी द्या वाल्या लोकांची वेदना मी समजू शकतो; राऊतांचा फडणवीसांना टोला
- ‘वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

