Share

Wedding| मेटाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग अन् उद्योजक टॉम बर्नथल यांनी रचला विवाह

Published On: 

🕒 1 min read

Team Maharashtra Desha: मेटाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग यांनी शनिवारी वायोमिंगमध्ये उद्योजक टॉम बर्नथल यांच्यासोबत विवाह केला आहे. मिस्टर बर्नथल हे माजी NBC बातम्या निर्माते आहेत. तसेच ते सल्लागार कंपनी केल्टन ग्लोबलचे संस्थापक देखील आहेत. या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम वर त्यांच्या लग्नाची घोषणा केली असून एक फोटो देखील शेअर केला आहे.

जोडप्याच्या फोटोचं कॅप्शनः

शेरिल सँडबर्ग यांनी आपला फोटो शेअर करताना मॅरीड म्हणजेच विवाहित, असं कॅप्शन देत पुढे बदामचे आठ इमोजी दिले आहेत. तर टॉम यांनी भावूक कॅप्शन दिलं आहे. आम्ही दोघांनीही खूप काही गमावलं असून आम्हाला पुन्हा प्रेम होईल अशी खात्री नव्हती, मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही आमचं आयुष्य एकत्र जगत असून आमच्या परिवाराला देखील एकत्र आणलं आहे. तसेच आज लग्न करून आमचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं टॉम यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

जोडप्याच्या मागील लग्ना बाबत माहितीः

जोडप्याच्या मागील लग्ना बाबत बोलायचं झालं तर शेरिल सँडबर्गने यांनी SurveyMonkeyचे CEO गोल्डबर्ग यांच्याशी विवाह केला होता. मात्र २०१५ साली वयाच्या ४७व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तर टाॅम यांचा घटस्फोट झाला आहे. शेरिलना त्यांच्या दिवंगत पती पासून दोन मुलं आहेत तर टाॅम यांना त्यांच्या पहिल्या लग्ना पासून तीन मुल आहेत. विशेष बाब म्हणजे पाचही मुले लग्नाच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती.

सँडबर्गने केली होती घोषणा :

या वर्षाच्या सुरुवातीला, सँडबर्गने घोषणा केली होती. यामध्ये त्या 2022 च्या शरद ऋतूत मेटा च्या COO पदावरून पायउतार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर 1 ऑगस्ट रोजी, Javier Olivan, Ms Sandberg ची COO म्हणून जागा घेतली. त्या 30 सप्टेंबरपर्यंत मेटाची कर्मचारी असतील आणि त्यानंतर सँडबर्ग संस्थेच्या संचालक मंडळावर काम करत राहतील. तसेच त्या त्यांच्या पाया आणि परोपकारी कार्यावर लक्ष केंद्रित करतील, असं त्यांनी त्यांच्या घोषणेमध्ये म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!