Share

अनिल देशमुखांना हाय कोर्टाचा दणका; याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

Published On: 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उच्च न्यायालय उच्च न्यायालय चौकशी प्रकरणावरुन रात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र सीबीआयने देशमुख यांच्या जावयाचे अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकरणानंतर आता देशमुख यांना हाय कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे.

ईडी कारवाईविरोधात देशमुख यांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सुनावणी देण्यास नकार दिला आहे. दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागितल्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांची याचिका आता दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्यावर सीबीआय पाठोपाठ ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे.

सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळालं. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!