Share

अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग; सुशिक्षित लोकांसह महिलांनाही दिली जाणार संधी

Published On: 

काबुल – अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग आलाय. तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंडळ बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सर्व सहकारी गटांना एकत्र घेऊन तीन दिवसांनंतर तालिबानकडून सत्ता स्थापनेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमीने संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील चर्चा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर सरकारच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी तालिबानचा प्रसिद्ध नेता मुल्ला अब्दुल गनी बरदारवर सोपवण्यात येणार आहे.

नवीन सरकारमध्ये पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा समावेश असे आणि मागील २० वर्षांपासून सरकारमध्ये असणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, अशी माहिती कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिलीय. विशेष म्हणजे सरकारमध्ये महिलांनाही स्थान दिलं जाईल असंही अब्बास म्हणालेत. सरकार हे अखुंदजादाच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे संकेत तालिबानने दिलेत.

दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतात तालिबानी सैनिक आणि अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली प्रतिकार करत असलेल्या फौजेदरम्यानची लढाई अद्याप चालू आहे. दोन दिवसांपासून चालू असलेल्या या युद्धामध्ये दोन्ही बाजूंचे नुकसान झाल्याच्या वृत्ताला तालिबानने पुष्टी दिली आहे. पंजशीरवर तालिबान्यांनी केलेला हल्लाला आपण प्रत्युत्तर दिलं असून त्यामध्ये तालिबान्यांना मोठ्या प्रमाणावर सैनिक गमवावे लागले असल्याचं प्रतिकार करणाऱ्या गटाने म्हटलं आहे तर तालिबानने आपण पंजशीरवर हल्ला केल्याचा आरोप फेटाळून लावत मसूद समर्थकांनी आमच्या फौजांवर हल्ला केला, आम्ही फक्त त्याला प्रत्युत्तर दिलं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आज 6000 अमेरिकी नागरिकांना बाहेर काढलं. आत्तापर्यंत एकंदर 1 लाख 24 हजारांहून अधिक इतर लोकांना अफगाणिस्तानातून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती अमे रिकेचे संरक्षण सचिव लॉईड जे ऑस्टीन यांनी दिली आहे. या अफगाण निर्वासितांचं अमेरिकी सैनिकांनी अत्यंत सौहार्दानं अमेरिकेत स्वागत केले ही प्रशंसनीय बाब असल्याचं ऑस्टिन यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!