Share

‘तुम्हाला दिल्लीतल्या दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का?’, नाना पटोलेंचा गडकरींना खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात देखील त्यांनी महाराष्ट्रासाठी खास प्रयत्न करून संकटात मोठी मदत केली होती. फारसे कधी न संतापणारे गडकरी आता मात्र शिवसेनेच्या दहशत पसरवणाऱ्या कारवायांमुळे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून कारवाईचा इशारा देखील दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तत्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गडकरींना शिवसेना कशी कामे करते हे माहिती नव्हते का? त्यांना वरुन दाढीवाल्यानं आरोप करायला सांगितलं का? असा खोचक प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. महामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्र त्यांच्या मंत्रालयाला दिली आहे. त्याची चौकशी आणि एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी काढावी. महामार्गाची कामं झाली पाहिजेत. जर या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना काँग्रेस विरोध करेल असेही पटोले म्हणाले.

यापूर्वी भाजप आणि सेनेची युती होती. त्यावेळी गडकरींनी कधी शिवसेनेवर टीका किंवा आरोप केले नाहीत. आज मात्र ते शिवसेनेवर पत्र लिहून आरोप करत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण २५ वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हतं का? असे पटोले म्हणालेत.

नितीन गडकरी यांनी पत्रात मांडलेले मुद्दे
मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामे रखडली आहेत. मी माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं मला कळलं, असंही गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरु राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल.विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण झाले आहेत. मागण्या पुर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, असं विधान करतानाच त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘ही कामे ‘डिस्कोप’केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा,’ आदी मुद्दे गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!