Share

देहूत अजित पवारांना बोलू दिलं नाही! सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Published On: 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर होते. येथे मंचावर पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण न झाल्याने राजकारण तापले.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले असून, ही गंभीर बाब आहे. हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि प्रोटोकॉल अंतर्गतच दिल्लीतील कार्यालयात भाषणासाठी पत्र लिहिले, परंतु प्रतिसाद आला नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!