Share

अभिनेत्री साराने सुशांत सिंगसाठी शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाली…

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांत सिंगचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून आदरांजली वाहत आहेत. अनेक चाहत्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दरम्यान, अभिनेत्री साराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

अभिनेत्री साराने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की ,’पहिल्यांदा कॅमेराला सामोरं जाण्यापासून ते तुझ्या दुर्बिणीतून पहिल्यांदा गुरू आणि चंद्र पाहण्यापर्यंत तुझ्यामुळे अनेक गोष्टी मी पहिल्यांदा अनुभवल्या. ते सर्व क्षण आणि आठवणी मला दिल्याबद्दल धन्यवाद. आज पौर्णिमेच्या रात्री जेव्हा मी आकाशाकडे पाहीन तेव्हा मला माहित आहे की तू तिथे तुझ्या आवडत्या तारे आणि नक्षत्रांसोबत चमकत असशील. आता आणि कायमचं, अशा शब्दांमध्ये अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Cex7VnHv0yD/

२०१८ साली केदारनाथ हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाची शूटिंग चालू असताना दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा होत होत्या. सुशांत सिंग चा मित्र सॅम्युअल याने सारा आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती दिली होती. पण या दोघांचे नाते दीर्घकाळ टिकू शकले नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!