Share

फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीवर हातोडा मारीत होते काय?” सामनाच्या अग्रलेखातून टीका

Published On: 

मुंबई : मुंबईत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची १ मे रोजी भव्य अशी ‘बुस्टर डोस’ सभा होती. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पोलखोल यात्रा सुरु आहे. या पोलखोल यात्रेतून भाजप नेत्यांकडून शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात येत होती. यावेळी बोलताना फडणवीसांनी चौफेर टीका सुरु केली होती.

फडणवीस म्हणाले कि, काही लोकांना वाटतं की, महाराष्ट्र म्हणजे मी, पण त्यांना सांगू इच्छितो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र हा अठरा पगड जातीचा आहे. १२ कोटी लोकसंख्येचा आहे. बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. परंतु, बाबरी पाडताना मी उपस्थित होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यानंतर आता फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.

आज सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही.

शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल, असा टोला सामन्याच्या अग्रलेखातून लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!