मुंबई : यंदा बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर,वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते या तिघांच्या स्वरसाजमध्ये तयार झालेला हो’कोकणचा गणपती ‘ गाण्याची धूम पहायला मिळणार आहे.
सागरिका दास यांनी दिग्दर्शन केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा अगदी कोकणातल्या गणपती उत्सवाची आठवण करून देतो. हे गाणं आता सर्व प्लॅटफॉर्म्स वर ऐकायला मिळणार आहे. तर चिंतामणी सोहोनी, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित केलेला व्हिडिओ उद्यापासून मराठी युटयूबवर पाहता येणार आहे.
संगीत क्षेत्रात आपले वैविध्य आणि वेगळंपण नेहमीच जपणाऱ्या सागरिका म्युझिकने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. यावर्षी रसिकांसाठी कोकणचा गणपती घेऊन आले आहेत. हो ‘कोकणचा गणपती’ हे गाणं ऑडिओ आणि विडिओ या रूपात आले आहे. चिंतामणी सोहोनी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि गायलं ही आहे. चिंतामणी सोबत या गाण्यात महाराष्ट्रातील तीन प्रसिद्ध गायक वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी आपला स्वरसाज या गाण्याला दिला आहे. रघुनाथ मतकरी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या लाटेतही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘या’ चार शेलेदारांनी बेळगावात फडकत ठेवला भगवा
- ‘आता मी कोणासाठी जगणार…’; सिद्धार्थच्या आईने व्यक्त केल्या वेदना
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

