बेळगाव – बहुचर्चित बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. या निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे.
या निवडणुकीत भाजपनं 35 काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे 36 सदस्य होते.
दरम्यान, एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपाच्या लाटेमध्ये एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवत बेळगाव महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि मराठी भाषिकांचा भगवा फडकवत ठेवला आहे. वैशाली भातकांडे, शिवाजी मांडोळकर, रवी साळुंके आणि बसवराज मोदगेकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झाले.
वैशाली भातकांडे यांनी प्रभाग क्रमांक १० मधून विजय मिळवला. तर शिवाजी मांडोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून वियज मिळवला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रवी साळुंके यांनी प्रभाग क्रमांक २७ मधून विजय मिळवला. तर बसवराज मोदगेकर यांनी प्रभाग क्रमांक ४८ मधून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘आता मी कोणासाठी जगणार…’; सिद्धार्थच्या आईने व्यक्त केल्या वेदना
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
