Share

धर्मेंद्र यांनी दाखवली ६२ वर्षांपूर्वीच्या व्हिंटेज कारची झलक, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Published On: 

मुंबई :अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असून ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. धर्मेंद्र हे नेहमी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या पहिल्या व्हिंटेज गाडीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

होळीच्या निमित्ताने धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांची जुनी फिएट गाडी चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धर्मेंद्र हे डोंगरातील एका खडबडीत रस्त्यांवर गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. त्यांची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.

व्हिडीओमध्ये या वयातही ते फार मस्त गाडी चालवताना दिसत आहे. ‘माझी जुनी फिएट’ असे त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. माझी सर्वात आवडती, माझी पहिली कार. मी ही गाडी १९६० मध्ये विकत घेतली होती. आज मी तिला डोंगरातील एका खडबडीत रस्त्यावरून चालवले. होळीच्या शुभेच्छा. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो., असे धर्मेंद्र म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!