नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन, कडक निर्बंध असे उपाय योजिले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात चूल पेटणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. अशात देशात मात्र इंधन दरवाढीने आकाश गाठले आहे. यात विशेष आणि संतापाची बाब म्हणजे या दरवाढीला सामान्य जनतेला मिळत असलेल्या सुविधा कारणीभूत असल्याचा बालिश तर्क पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. याच दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे.
‘मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर 35 हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या MSP ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत’ असं प्रधान यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- लक्ष्मण यांनी सांगितली टीम इंडियाची कमजोरी ; रोहित-गिलला दिला ‘हा’ सल्ला
- सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत आहेत, पडळकरांचा गंभीर आरोप
- कर्ज फेडण्यासाठी सोने व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या ‘त्या’ कारागिराची पोलिस कोठडीत रवानगी
- ‘कॉफी विथ करणचा’ नवा सिझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

