Share

कर्ज फेडण्यासाठी सोने व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या ‘त्या’ कारागिराची पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

औरंंगाबाद : शहरातील लालचंद मंगलदास सोनी या सराफाकडे विश्वासू कारागिर म्हणून काम करणाऱ्या अमरचंद प्रेमदास सोनी (वय ४४, रा.पानदरिबा) याला क्रांतीचौक पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अमरचंद सोनी याने गेल्या गेल्या सव्वा वर्षात ४० लाख १८ हजार रूपये किंमतीच्या ८४५ ग्रॅ.९०० मिली.ग्रॅ सोन्याचा अपहार करून सराफा व्यावसायीकाची फसवणूक केली होती. अटकेत असलेल्या अमरचंद सोनी याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरचंद सोनी हा गेल्या अनेक वर्षांपासून लालचंद मंगलदास सोनी या रोकडिया हनुमान कॉलनी परिसरातील पेढीवर कारागिर म्हणून काम करंत होता.१ एप्रिल २०२० पासून ४ जून २०२१ या काळात पेढीचे मालक उदय सोनी यांनी अमरचंद सोनीला ३किलो २७९ ग्रॅ. ४९०मिली ग्रॅ सोने दागिने घडवण्यासाठी दिले होते. त्यापैकी अमरचंद सोनीने २किलो ४३३ ग्रॅ. ५९०मिली ग्रॅ वजनाचे दागिने दिले. बाकीच्या सोन्याचा ८४५ ग्रॅम ९००मिली ग्रॅम सोन्याचा हिशोब अमरचंद सोनी पेढीचे मालक सोनी यांना देता येत नव्हता.

शेवटी मंगळवारी सायंकाळी उदय सोनी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर क्रांतीचौक पोलिसांनी अमरचंद सोनी ला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!