Share

मैदान, खेळण्यांसह सुविधांनी परिपूर्ण; धर्मवीर संभाजी विद्यालयात ५० खाटांचे मोफत विलगीकरण केंद्र

Published On: 

औरंंगाबाद : कोव्हिड -१९ या महामारीच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी दीनदयाल बाल कोव्हिड-१९ विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी धर्मवीर संभाजी विद्यालय येथे ५० खाटांचे विलगीकरण केंद्र उभारले असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली असून येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता देखील वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर पंडित दीनदयाल उपाध्यक्ष शिक्षण संस्थेच्या वतीने बाल कोव्हिड रूग्णांसाठी सिडको एन-५ परिसरातील धर्मवीर संभाजी विद्यालय येथे ५० खाटांचे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या विलगीकरणात दाखल होणाऱ्या बाल कोव्हिड रूग्णांसाठी तज्ञ डॉक्टर, नर्सेस आदी उपचारासाठी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच बाल कोव्हिड रूग्णांना मोफत जेवण आणि औषधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आ.बागडे यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग लिमिटेड आणि देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या सौजन्याने धर्मवीर संभाजी विद्यालय येथे दीनदयाल बाल कोव्हिड-१९ विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून बाल कोव्हिड रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विधनसभेचे माजी अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस पंडित दीनदयाल उपाध्यक्ष शिक्षण संस्थेचे सचिव शामसुंदर देसाई, राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!