🕒 1 min read
बीड : राज्यात कोरोनामुळे बार्टीचे मोफत स्पर्धा प्रशिक्षणाचे क्लासेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बंद असलेले बार्टीचे क्लास तत्काळ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टी महासंचालक पुणे यांना दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे यांना बार्टीचे मोफत स्पर्धा क्लासेस सुरु करण्या संदर्भात छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी निवेदन सादर केले होते.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेले व्यवहार आणि शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी सुरू झालेली आहे. मात्र बार्टीचे क्लासेस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत राहुल वाघमारे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टी महासंचालक पुणे यांना दिले आहेत. त्यामुळे आता प्रशिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची असुविधा दूर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आलबेल; पण स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी
- ‘मोदीजी लक्षात ठेवा, तुमची तिजोरी अंबानी-अदानी नक्की भरतील, पण तुमचे ‘पोट’ अन्नदाता शेतकरीच भरतील’
- ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’; ‘त्या’ ठाकरेंच्या उपस्थितीवर वरुण सरदेसाईंनी डागली तोफ
- कुलाबा येथील महापालिका शाळा आरक्षण मागच्या दाराने रद्द करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – भाजपा
- बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


