पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. याबाबत तिने पोलिसांना लेखी लिहून दिलं आहे.
रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने धनंजय मुंडे यांच्यावर टिकासत्र सुरु केलं होतं. रेणू शर्मा यांनी आरोप केल्यानंतर धंनजय मुंडे यांनी नैतिकतेने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींत आणखी भर पडत होती.
आता या महिलेने माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला.’ असं ते म्हणाले.
तर, ‘धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली. त्यांच्या मागे कुटुंब अक्षरश: पाच सहा दिवस अडचणीत आले. डिस्टर्ब झाले. याला कुणी वाली आहे की नाही,’ असा संतप्त सवाल देखील अजित पवार यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करा – भाजप
आता रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसानीं करावी यामुळे ज्या खऱ्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणार्यांना शिक्षा व्हायलाचं हवी’ असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तब्बल ५.६२ लाख भारतीयांचा डेटा चोरी कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल
- वाई न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार : नाना पटोले
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

