पुणे : आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही. पण, हेही तितकेच खरे आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ अस राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवाय, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये. असा घणाघात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल. अस देखील फडणवीस म्हणाले आहेत. तर आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतली नाही, एकाही पत्राला उत्तर नाही, कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला प्रश्न सोडवायचे नाही. अशावेळी जनतेचे दु:ख मांडले गेले पाहिजेत आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडतो आहोत. अशी टीका देखील फडणवीस यांनी केली.
तर, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राचा गुजरातपेक्षा जास्त विकास केला – देवेंद्र फडणवीस
- दुष्काळ निवारणासाठी काम करणारे अभिनेते मकरंद अनासपुरेंच्या नावाची राज्यपालांकडे शिफारस!
- चीनच्या पायाखालची वाळू सरकली म्हणे…’भारताची अॅपबंदी म्हणजे जागतिक व्यापार नियमांचा भंग’
- …अन् ‘त्या’ जखमी ऊसतोड कामगारास पंकजा मुंडेंनी दिला मायेचा आधार!
- इंदोरीकर महाराजांना आमदार करा! रयतचं राज्यपालांना साकडं


