🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषदेत राज्यपालांना एकूण १२ व्यक्ती आमदार म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार असतो.राज्य विधान परिषदेच्या १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या ह्या जून महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबल्या होत्या. यानंतर, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन १२ व्यक्तींच्या नावाची यादी सुपूर्द केली होती.
नावं सुपूर्द केल्यानंतरही राज्यपालांनी बराच काळ घेतल्यामुळे ते महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या नावांवर हरकत घेऊन शकतात अशी शक्यता वर्तवली जात असतानाच रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली आहे.
या १२ जणांच्या यादीत त्यांनी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराजांचा देखील समावेश केला आहे. सद्या एका वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर न्यायालयात खटला सुरु असतानाच इंदोरीकर महाराजांच्या नावाची शिफारस थेट आमदारकीसाठी केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. इंदोरीकर महाराजांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. अगदी युवकांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांच्या कीर्तनाची चर्चा सुरु असते. त्यामुळे, आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीसह अन्य नेत्यांचं देखील लक्ष्य लागलं आहे.
रयतने कोणाकोणाच्या नावांची शिफारस केली?
मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांच्या नावांची शिफारस सदाभाऊंनी राज्यपाल नियुक्त कोट्यातील आमदारकीसाठी केली आहे. या सर्व व्यक्ती त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांतदादांना कोणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली?; अजित पवारांचं प्रत्युत्तर
- सुजय विखे व राम शिंदे यांचे अखेर मनोमिलन; स्थानिक आमदारांसाठी धोक्याची घंटा?
- बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील
- २६ नोव्हेंबरच्या कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा- बाळासाहेब थोरात
- ‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
