Share

दुष्काळ निवारणासाठी काम करणारे अभिनेते मकरंद अनासपुरेंच्या नावाची राज्यपालांकडे शिफारस!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषदेत राज्यपालांना एकूण १२ व्यक्ती आमदार म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार असतो.राज्य विधान परिषदेच्या १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या ह्या जून महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबल्या होत्या. यानंतर, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन १२ व्यक्तींच्या नावाची यादी सुपूर्द केली होती.

नावं सुपूर्द केल्यानंतरही राज्यपालांनी बराच काळ घेतल्यामुळे ते महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या नावांवर हरकत घेऊन शकतात अशी शक्यता वर्तवली जात असतानाच रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली आहे.

या १२ जणांच्या यादीत त्यांनी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या देखील नावाची शिफारस केली आहे. आपल्या खास शैलीने उभ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या मकरंद अनासपुरे यांचे दुष्काळ निवारणासाठीचे काम चर्चेत राहिले आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला होता.

जनसहभाग वाढवून जमिनीत पाण्याचा निचरा वाढवण्याच्या मोहिमेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळेच आता कला क्षेत्रासह सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग लक्षात घेता रयतने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेसाठी त्यांच्या नावाची शिफारस केल्याचं समजत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!