नवी दिल्ली : मे महिन्यामध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षानंतर भारताने चिन निर्मित मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. भारत वारंवार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली अॅप्सवर बंदी घालत असल्याचा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला आहे. चिनी प्रवक्त्या जी रोंग यांनी भारताच्या निर्णयाचा विरोध करताना म्हटलं आहे की, “अॅप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असून चीन याचा विरोध करत आहे. भारत सर्व देशांना निष्पक्ष, निःपक्षपातीपणे व्यवसायासाठीची बाजारपेठ उपलब्ध करु देईल आणि भेदभाव करणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे पालन उल्लंघन होणार नाही अशी अशा आहे,” असंही जी यांनी म्हटलं आहे.
भारताकडून अजून ४३ अॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन संतापला आहे. भारताकडून घेण्यात आलेल्या अॅप्सबंदीच्या निर्णयाचा चीनने विरोध केला आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिनी अॅप्सवर घातलेली बंदी ही जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचे उल्लंघन करणारी आहे असंही चीननं म्हटलं आहे. भारताने मंगळवारी चीनच्या आणखीन ४३ अॅप्सवर बंदी घातली. यामध्ये अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. आतापर्यंत भारताने एकूण २६७ अॅप्सवर बंदी घातली आहे.भारत वारंवार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली अॅप्सवर बंदी घालत असल्याचा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला आहे.
चिनी कंपन्या या आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि देशांमधील इतर नियंमांचे तसेच कायद्याचे पालन करुनच व्यवसाय करतात असंही जी यांनी नमूद केलं आहे. चीन आणि भारत हे देश एकमेकांसाठी नवीन संधी उपलब्ध करुन देणारे देश असून ते एकमेकांसाठी धोकादायक नाहीत, अशी भूमिका चीनने मांडली आहे. दोन्ही देशांनी आपल्या अर्थव्यवस्था आणि व्यापारी संबंध पूर्वीप्रमाणे सामान्य होतील आणि दोन्ही देशांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.
भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या अॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे. २९ जुलै रोजी सरकारने चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर २ सप्टेंबरला ११८ अॅप्सवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६९ ए अन्वये बंदी घालण्यात आली. सरकारने म्हटलं आहे की, “नागरिकांचं हित व देशाचे सार्वभौमत्व लक्षात घेऊन या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे”.
बंदी घालण्यात आलेली अॅप्सवर पुढीलप्रमाणे, अली सप्लायर्स मोबाइल अॅप, अलीबाबा वर्कबेंच. अलीएक्स्प्रेस स्मार्टर शॉपिंग, बेटर लिव्हिंग, अलीपे कॅशीयर, लालामुव्ह इंडिया डिलीव्हरी अॅप, ड्राइव्ह विथ लालामुव्ह इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड- बिझीनेस कार्ड रिडर, कॅमकार्ड बीसीआर (वेस्टर्न), सोल- फॉलो दी सोल टु फाइंड यू, चायनीज सोशल डेटिंग अॅप, वुईडेट, सिंगॉल डेटिंग अॅप, अॅडोर अॅप, ट्रली चायनीज, ट्रली आशियन, चायना लव्ह, डेट माय एज, आशियन डेट, फ्लर्टविश, गाइज ओन्ली डेटिंग, टय़ुबिट, वुई वर्क चायना, फर्स्ट लव्ह लाइव्ह, रेला, कॅशियर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजी टीव्ही. वुई टीव्ही,वुई टीव्ही सीड्रामा, व्हीटीव्ही लाइट, लकी लाइव्ह, टाओबाओ लाइव्ह, डिंग टॉक, आयडेंटिटी व्ही, आयसोलँड २, बॉक्स स्टार, हिरोज इव्हाल्व्हड, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, म्युककिन वॉच. कॉन्क्विस्टा ऑनलाइन २ यांचा समावेश आहे. आताच्या निर्णयाने चीनच्या अलीबाबा या कंपनीला फटका बसणार आहे. भारताने गेल्या काही महिन्यात एकूण २६७ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांतदादांना कोणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली?; अजित पवारांचं प्रत्युत्तर
- सुजय विखे व राम शिंदे यांचे अखेर मनोमिलन; स्थानिक आमदारांसाठी धोक्याची घंटा?
- बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील
- २६ नोव्हेंबरच्या कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा- बाळासाहेब थोरात
- ‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

