रत्नागिरी : शिवसेना आणि भाजपचा रस्त्यावरील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने काही दिवसांपूर्वी पाहिला. तर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गुलदस्तात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे. नारायण राणे यांच्या अटकेच्या प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान या भेटीवर आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जन आशीर्वाद यात्रा झाल्यानंतर राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेते आहेत. जर ते काही प्रश्नांसाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर त्यात काही नवल नाही. सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचा जेवढा रोल असतो तेवढाच विरोधीपक्ष नेत्याचा असतो. त्यामुळे एखाद्या बैठकीसाठी फडणवीस गेले असतील तर त्यात काही हरकत नाही.’ असे स्पष्ट मत नारायण राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूका घेऊ नका’, सर्वपक्षीय बैठकीत फडणवीसांची मागणी
- ‘ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत’, सर्वपक्षीय बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती
- ‘आपल्याच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं हेही मला माहितेय’, राणेंनी ‘त्या’ प्रकरणाला दिला उजाळा
- ‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन’, नारायण राणेंचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

