Share

‘तो लवंगी फटाका होता, तर तुम्ही एवढे का घाबरले?’

Published On: 

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील संपूर्ण माहिती, पुरावे एका सीलबंद लिफाफ्यात काल दिल्ली गाठून केंद्रीय गृहसचिवांना दिले असून, या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भातील सर्व पुराव्यांचे ६.३ जीबी भरलेले पेन ड्राईव आपल्याकडे असल्याचा दावा फडणवीसांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

दरम्यान, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांनी गृहसचिवांकडे सुपूर्द केलेल्या पुराव्यांची खिल्ली उडवली आहे. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. मात्र तो भिजलेला लवंगी फटाका निघाला. त्याला वातही नव्हती, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधान केलं होतं.

संजय राऊत यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काल जो अहवाल दिला तो लवंगी फटाका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर तुम्ही एवढे का घाबरले? तसेच 25 ऑगस्ट 2020 पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला ?’ असा सवाल देखील फडणवीसांनी राऊतांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!