Share

Sharad Pawar on Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती – शरद पवार

Published On: 

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मागील सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी असतानाही शिंदे यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती. सुरक्षा न देण्यामागे काही षडयंत्र होते का? गृहराज्यमंत्र्यांना कोणाचा फोन आला?, असे प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होत आहेत. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतरही आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने एकनाथ शिंदेंची सुरक्षा काढल्याची टीका होत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, “आज सकाळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोबत भेट झाली. त्यानं मी विचारलं की शिंदे साहेबाना तुम्ही झेड (Z)सिक्युरिटी दिली होती का तर ते हो म्हणला. मी स्वतः माजी गृह मंत्री यांच्याकडून ऐकले होते. म्हणुन या विषयावर अधिक चर्चा करणे मला योग्य वाटत नाही.”

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शरद पवार म्हणाले की, सबंध सरकार केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसते आणि त्याला त्यांच्या राज्याच्या सहकाऱ्यांची आणि केंद्रीय सहकाऱ्यांची आणि नेतृवाची सहमती आहे. ते सत्ताधारी आहे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल.

नितेश राणे यांच्या आरोपावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “मुलं बाळांच्या याच्या प्रतिक्रियांवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही. मला वस्तुस्थिती माहीत नाही पण शासनात अनेक वर्ष काम केल्यानंतर मला एक गोष्टीची माहिती आहे की सुरक्षा कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची याबाबत जे कोरम आहे. ते कॅबिनेट असत नाही .ही चर्चा कॅबिनेट मध्ये होत नाही. ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव हे गृह सचिव डिजी अश्या सिनियर लोकाची एक कमेटी असते. त्यापुढे निर्णय आणि शिफारशी केल्या जातात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!