Share

T20 World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. इंग्लंडचा महान फलंदाज जोनाथन ट्रॉट याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या आयर्लंड दौऱ्यापासुन तो संघाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करेल. यानंतर आता ट्रॉटसाठी आशिया कप ही पहिली मोठी स्पर्धा ठरणार आहे. अफगाणिस्तानने टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे.

यावर्षी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थार्प यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. संघाच्या आजारपणामुळे थॉर्प प्रशिक्षण देऊ शकणार नसल्याचे समजल्यानंतर मार्च महिन्यापासून थॉर्पे यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू होता. यानंतर आता इंग्लंडचे माजी फलंदाज जॉनथन ट्रॉट यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

ट्रॉटने शुक्रवारी एसीबीला सांगितले की,“मी अत्यंत समाधानी आणि उत्साहित आहे. कारण मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. हे वर्ष त्यांच्यासाठी एक संघ म्हणून मजबूत होण्यासाठी चांगले ठरले आहे. या संघातील खेळाडूंसोबत काम करण्यासाठी मी थांबू शकत नाही. या संघातील सर्व खेळाडूंमध्ये आपापल्या शैलीत सामन्याचा निकाल मिळवण्याची क्षमता आहे. हे सर्व अफगाणिस्तानच्या लोकांना अभिमान वाटावा असा क्षण देण्याचा प्रयत्न करतात.”

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या ट्रॉटने इंग्लंडसाठी ५२ कसोटी सामन्यांमध्ये ४४ पेक्षा जास्त सरासरीने ३८३५ धावा केल्या होत्या. यामध्ये ९ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २२६ होती. ६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ट्रॉटने २८१९ धावा केल्या आहेत. यामध्ये एकूण ४ शतकांचा समावेश आहे. ट्रोटने ७ टी-२० सामन्यात १३८ धावा केलेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!