मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, मागील सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र आता महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठवल्यानंतर भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी उठवण्यासाठी आग्रही मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ नियमांना व्हॉट्सऍप युजर्सनी घाबरण्याची गरज नाही; केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
- ‘शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे जिवलग मित्र होते; माझ्यात आणि राज मध्येही कॉमन पॉईंट !’
- अमेरिकन गुप्तहेर संस्था शोधून काढणार कोरोनाचा नेमका उगम कुठे झाला?
- ‘त्या’ व्हिडीओ मधील मारहाण करणाऱ्यांची होणार चौकशी – पोलिस अधीक्षक विनायक देशमुख
- ‘जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने दारूबंदी उठवली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

