Share

‘त्या’ नियमांना व्हॉट्सऍप युजर्सनी घाबरण्याची गरज नाही; केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

Published On: 

दिल्ली : देशात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच फेसबुक , ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या MEITY ने सर्व सोशल कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिने दिले होते. यामध्ये भारतात आपला अधिकारी आणि कॉंटेक्स ऍड्रेस देणे, अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकाऱ्यांची नेमणूक, तक्रारीचे निवारण, आक्षेपार्ह कंटेंटचे निरीक्षण करणे, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकणे अशा नियमांचा समावेश आहे.

दरम्यान, या कंपन्यांनी भारत सरकारने सांगितलेल्या नियमांचे अजूनही समावेश केला नसून हे सोशल मीडिया ऍप्सवर बंदीची टांगती तलवार आहे. अशातच आता व्हॉट्सऍप ने सरकारच्या डिजिटल नियमांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सरकारचे नवीन नियम कंपनीकडून वापरकर्त्यांना देण्यात येणाऱ्या एंड-टू-एंड एनक्रिप्शनमध्ये हस्तक्षेप करत असून यामुळे युजर्सची गोपनीयता धोक्यात येत असल्याचा दावा केला आहे.

यानंतर, आता इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत भाष्य केलं असून व्हॉट्सऍप युजर्सनी घाबरण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. ‘सरकार लोकांच्या गोपनीयतेचा पूर्ण आदर करतं. सामान्य व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनी या नवीन नियमांची भीती बाळगण्याची गरज नाही. नियमात नमूद केलेल्या विशिष्ट गुन्ह्यांचा संदेश कोणी सुरु केला, हे शोधणे हा त्याचा मुख्य हेतू आहे,’ असं स्पष्टीकरण दिलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवीन नियम बनविण्यात आला आहे. प्रश्न विचारण्याच्या अधिकारासह सरकार टीकेचे स्वागत करत आहे. नियम केवळ सोशल मीडियाच्या सामान्य वापरकर्त्यांना तेव्हा सक्षम करतात जेव्हा गैरवर्तन आणि गैरवापराचे बळी ठरतात. तसेच, आक्षेपार्ह मेसेजच्या पहिल्या ओरिजिनेटरबद्दल माहिती देणे आधीच प्रचलित आहे. हे मेसेज भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, बलात्कार, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्ह्यांशी संबंधित आहेत.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!