जालना : दीपक हॉस्पिटलमध्ये भाजयुमो कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. याची दाखल पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी घेत व्हिडिओ मधील मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांची अप्पर पोलीस अधीक्षक चौकशी करणार असून चौकशी अंती दोषी असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना सांगितले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस शिवाजी नारियलवाले यांना तत्कालीन डिएसपी सुधीर खिरडकर यांच्या समक्ष पोलीस निरीक्षकासह काही पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतोय. तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी देखील या युवकास मारहाण केल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
७ एप्रिल रोजी जालना शहरातील एका जिम चालकाचा अपघात झाला होता. त्यास गंभीर जखमी अवस्थेत जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संतप्त मित्रांनी रुग्णालयात तोडफोड केली होती. याच वेळी पोलीस तेथे आल्याने रुग्णालयात तोडफोड करणारे तरुण फरार झाले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले पोलिसांच्या तावडीत सापडले.
त्यावेळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेऊन बेदम मारहाण केली. शिवराज यांनी गयावया करीत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे पाय देखील धरले. परंतु पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी अंगावर काठी तुटेपर्यंत या युवा कार्यकर्त्यास बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक

