Share

अमेरिकन गुप्तहेर संस्था शोधून काढणार कोरोनाचा नेमका उगम कुठे झाला?

Published On: 

नवी दिल्ली- कोविड-19 या विषाणूचा संसर्ग चीनमधील वुहान इथं सुरू झाला. एखादा प्राणी या संसर्गाचा मूळ स्त्रोत आहे का किंवा संशोधन प्रयोगशाळेच्या अपघातामुळे हा विषाणू चीनमध्ये पसरला याचा तपास करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेला 3 महिन्यांचा कालावधी दिला आहे.

मागील वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना साथीशी लढत असून अमेरिकेत आतापर्यंत 4.4 दशलक्षांहून अधिक नागरिक या आजारामुळे दगावले आहेत. या आजाराचा नेमका स्त्रोत शोधण्यासाठी गुप्तहेर संस्थेच्या 2 वेगळ्या तुकड्या संभाव्य स्त्रोतानुसार विभागल्या असून गुप्तहेर संस्थेचे हे प्रयत्न नेमक्या निष्कर्षापर्यंत पोहोचवतील असं व्हाईट हाऊसनं काल जाहीर केलेल्या निवेदनात बायडन यांनी सांगितलं.

बायडन यांच्या या वक्तव्यामुळे हा विषाणू प्रथम कसा निर्माण झाला या विषयीच्या वादात आणखी वाढ झाली आहे. हे उत्तर सापडलं तर त्याचे चीनवर भरीव परिणाम होतील कारण या महामारीला आपण जबाबदार नसल्याचं चीननं म्हटलं आहे. आणि अमेरिकी रिपब्लिकन सदस्यांनी प्रयोगशाळेतून या विषाणूचा जन्म झाल्याचं कारण पुढे करुन चीनवर सतत दबाव ठेवला या दृष्टिनं अमेरिकी राजकारणाकरिता हा मुद्दा महत्वाचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!