Share

‘जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने दारूबंदी उठवली’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, मागील सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र आता महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठवल्यानंतर भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

‘नेहरूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदी उठवण्याचा अत्यंत पुरोगामी निर्णय घेतला आहे. अवघे ठाकरे सरकार सतत ‘मद्या’च्या धुंदीत असल्यामुळे अवघ्या कारभाराची स्थिती हलेडूले झाली आहे,’ असा प्रहार अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

मंत्री विजय वडेट्टीवारांचं अजब स्पष्टीकरण !

‘जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे.’ असं पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!