Share

शिवसेना नेत्यांना वाटू लागली मुंबई महापालिका हातची जातेय की काय याची भीती ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपतोय. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर मुंबई महापालिका निवडणूक येऊन ठेपली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबईला ओळखलं जातं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.  फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबईसह 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्यांच्यातल्या शेकडो पंचायत समित्यांची निवडणूक होतेय.

गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे.  यामुळेच या निवडणुकीत मुंबई महापालिका हातची जातेय की काय अशी भीती शिवसेनेतल्या नेत्यांना वाटतेय का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपने राज्यसरकारवर हल्ले वाढवले असून भाजपनं लक्ष्य केलेल्या शिवसेनेच्या पाच नेत्यांपैकी तीन नेते मुंबईतले आहेत. भाजपनं मुंबई महानगर पालिका जिंकून शिवसेनेला जन्माची अद्दल घडविण्याचा चंग बांधला असून संपूर्ण शक्ती या निमित्ताने भाजप पणाला लावणार हे सेनेच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. गुजराती टक्का लक्ष्यवेधी असलेल्या  मुंबईच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगलाच जोर लावावा लागणार अशी हे सर्वश्रुत आहे. मुंबईत ना राष्ट्रवादीची ताकत आहे ना म्हणावी तेवढी कॉंग्रेसची.त्यामुळे पराभव झालाच तर शिवसेनेचीच नाचक्की होणार हे देखील निश्चित आहे.

महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून सत्तेचा उपभोग घेणाऱ्या कॉंग्रेसने रंग दाखवायला सुरुवात केली असून आता ते स्वबळाची भाषा करू लागले असल्याने याचा देखील फटका शिवसेनेलाच बसणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर युती करण्याची शक्यता आहे.कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

शिवसेनेच्या 93 तर भाजपच्या 82 जागा आहेत. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलय. पण भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची चर्चा होत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेना आणि भाजप यांचा काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असते. जर हे दोन पक्ष एकत्र आले तर मात्र शिवसेनच्या अडचणी वाढू शकतात. मराठी मते तसेच हिंदू आणि गुजराती मते सुद्धा भाजपच्या आणि मनसेच्या झोळीत जाऊ शकतात. याचाच परिपाक म्हणून महापालिकेतील सत्ता देखील जाऊ शकते.

एवढ्या अडचणी असल्या तरीही कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने मुंबईत चांगल्याप्रकारे काम केले आहे. शिवाय मराठी भाषेचे ट्रम्प कार्ड देखील त्यांच्याकडे आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे देखील मुंबईतील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने भाजपला देखील वाटते तेवढी निवडणूक सोपी असणार नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!