Share

Devendra Fadnavis | अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांनी पुन्हा केलं वक्तव्य म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. शिंदे गट विरोधात ठाकरे गट तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू आहे. अशातच भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका प्रसारमाध्यांना एक मुलाखत दिली आहे. त्यावेळी दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर घेतेलेल्या शपथविधीवरून पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना राज्यात सध्या सुरू असलेल्या विषयांवर सवाल करण्यात आले. त्यावेळी त्यांना अजित पवारांसोबत घेतलेला शपथविधीबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, त्यांच्यासोबत केलेला शपथविधी ती माझी चूक होती.

पुढे अजित पवार असंही म्हणाले की, राजकारणात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात कारण जेव्हा तुमच्या पाठीत खंजीर खुपसलं जातं त्यावेळी बदला घेण्यासाठी तुम्हाला जीवंत राहावं लागतं. तसेच या मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पवारांसोबतच्या शपथ विधीपासून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा केल्या आहेत.

दरम्यान, भाजप पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी सुरू असलयाचं पाहायला मिळतं आहे. दोघंही एकमेकांवर सडकून टीका आणि टोलेबाजी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!