Share

Navneet Rana | नेटकरी संतापले! नवनीत राणांनी गणपती बाप्पांना गढूळ पाण्यात अक्षरश: फेकून दिलं

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : शुक्रवारी ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. एकीकडे अशा भावपूर्ण वातावरणात विसर्जन होत असताना असताना दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या गणेश विसर्जन पद्धतीने नेटकरी प्रचंड संतापले आहेत.

नवनीत राणा यांनी गणपती अक्षरश: फेकून दिलाः

राज्यभरात गणरायाचं थाटा-माटात विसर्जन होत असताना नवनीत राणा यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं. मात्र, त्यांच्या विसर्जन पद्धतीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाला डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या आणि नंतर मुर्तीला तलावात थेट अक्षरश: फेकून देत विसर्जन केलं.

पाहा व्हिडीओः

नेटकरी संतापलेः

राणांनी ज्या पाण्यात गणपतीचं विसर्जन केलं ते पाणी प्रचंड अस्वच्छ होतं, गढूळ होतं. नवनीत राणांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी राणांना तुफान ट्रोल केलं. तुम्ही सतत हिंदू धर्म लोकांना शिकवता मग गणपती विसर्जन कसं करतात हे तुम्हाला माहिती नाही का? असा सवाल अनेकांनी नवनीत राणा यांना विचारला आहे.

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या लव्ह जिहाद प्रकणामध्ये करुनही नवनीत राणा यांना मुलीच्या जबाबानंतर तोंडघशी पडावं लागलं. या साऱ्या प्रकरणामुळे नवनीत राणा देशभर चर्चेत आल्या. हनुमान चालिसा असो वा ‘मातोश्री’शी घेतलेला पंगा, नवनीत राणा माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. त्यामुळे ठाकरेंचे कट्टर विरोधक अशी राणांची ओळख बनलेली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!