कोकण : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांविरोधात आरोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येते. अशातच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर टीकांचा वर्षाव करत आहे.
काय म्हणाले विनायक राऊत ?
शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत अमिषे दाखवून फोडाफोडी करण्यापेक्षा अन्य पक्षांत असलेल्या आपल्या हितचिंतक व विरोधी पक्षात असताना मदत केलेल्या नातेवाईकांना पहिले शिंदे गटात घ्यावे, असं म्हणत विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार राऊत यांनी मालवण येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी बोलत होते.
शिवसेना पक्षात फोडाफोडी करण्याचा त्यांना अधिकार नाही. कितीही आमिषे दाखवली, काही झाले तरी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक सामंत यांना दाद देणार नाहीत. पुढे राऊत असंही म्हणाले की, दीपक केसरकर शिंदे गटात गेले. परंतु त्यांनी शिवसेना संघटनेत गडबड केली नाही. मात्र, उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करत आहेत.
तसेच, शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत येणार नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत अनेक आमदार घडले आहेत. त्यातील आज शिंदे गटात गेले आहेत.परंतू उदय सामंत ज्याप्रकारे शिवसेनेत फोडाफोडीचं काम करत आहेत, ते चुकीचं असल्याचंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | मुंबई आणि बारामती ताब्यात घेऊन भाजपाला महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खतम करायचे; शिवसेनेचा थेट आरोप
- Uddhav Thackeray | “अमित शहांनी तेव्हा फडणवीसांना थांबवले असते तर…”; – उद्धव ठाकरे
- Shivsena | शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी शिंदे गटाबाबत केला ‘हा’ गौप्यस्फोट म्हणाले…
- Ravi Rana | अमरावतीतील बेपत्ता मुली प्रकरणासंबंधी रवी राणांनी पोलीस आयुक्तांवर केले ‘हे’ गंभीर आरोप
- Chandrakant Patil | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकात पाटलांचा टोला म्हणाले…


