पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या 231 व्या जयंती सोहळा काल पुण्यात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितस होते. त्याठिकाणी बोलताना फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली असल्याचं समजतं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची घोषणा-
रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची व राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.त्यांनी पुढे सांगितले की, रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जाती मधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत. यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. या समाजाच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
इंग्रजांविरुद्ध प्रथम आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक-
स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याकरीता ज्यांनी बलिदान दिले त्या नाम-अनाम वीरांचे स्मरण होणे आवश्यक आहे.शिवाजी महाराजांनंतर इतिहासात इंग्रजांविरुद्ध प्रथम आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक होते. ते खरे आद्यक्रांतिकारक नव्या स्वराज्याचे राजे होते. स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे काम उमाजी नाईक यांनी केले. ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, रणजितसिंग नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल, गोपीचंद पडळकर, संजय जगताप, दौलतनाना शितोळे, योगेश टिळेकर, अभिमन्यू पवार आणि आदी नेतेही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Shahaji Bapu Patil । शरद पवारांची एका निवडणुकीत दमछाक झाली होती; शहाजी बापूंनी सांगितला ‘त्या’ निवडणुकीचा किस्सा
- Parth Pawar । अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा एकदा रत्नागिरीसाठी रवाना…
- यंदा कर्तव्य आहे! अथिया शेट्टी आणि के एल राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात
- Eknath Shinde meet Nana Patekar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नाना पाटेकर यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

