मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीतूनच विसर्जन केले, तर राज्यातून या पक्षाचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे .यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टोला लगावला होता. यानंतर भाजपने आपले पूर्ण लक्ष बारामती वर केंद्रित केलं आहे. असं असतानाच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील यांनी पवारांचा एका निवडणुकीत कसा घामटा निघाला होता, याची आठवण करून देऊन भाजपच्या उत्साहाला बळ देण्याचा प्रयत्नच केला आहे. राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं सांगतानाच वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती. हे सुद्धा विसरता येणार नाही, असेही शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.
यानंतर यावर आता राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले –
बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती त्यांना नाही. त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल. परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही. एवढं ते घट्ट नातं बारामतीकर आणि पवार कुटुंबीयांचं आहे, असं पाटील यांनी सांगितलं. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले –
बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला केला आहे. यासंदर्भात आव्हाडांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक ट्विट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Parth Pawar । अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा एकदा रत्नागिरीसाठी रवाना…
- यंदा कर्तव्य आहे! अथिया शेट्टी आणि के एल राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात
- Eknath Shinde meet Nana Patekar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नाना पाटेकर यांची भेट
- Rohit Sharma । आम्हाला या दोन पराभवांची फारशी चिंता नाही, पत्रकार परिषदेत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

