Share

Parth Pawar । अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : गणेशोत्सवाची धामधूम यंदा इतर वर्षांपेक्षा काहीशी जास्तच असल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला राजकारणातल्या दावे-प्रतिदाव्यांची झालर आहे. राजकीय सत्तानाट्याची जोड लाभल्याने यंदाचा गणेशोत्सव केवळ सण न राहता तो राजकीय इव्हेंट होऊ पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घरी यावर्षी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यत दिग्गजांनी शिंदेंच्या बाप्पाचं दर्शन घेतल. एकीकडे मुंबई महागांगर पालिकेच्या निवडणुका आणि दुसरीकडे शिंदेंच्या घरी वाढती गर्दी राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आज तर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली.

सध्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत सर्वच नेते एकमेकांकडे जात आहे. मुख्यमंत्री शिंदे देखील दररोज विविध गणेश मंडळांनी आणि नेत्यांच्या घरी स्थापन गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाताना दिसत आहेत. मात्र पुत्र पार्थ पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ते वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

यावेळी, पार्थ यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जावून बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी श्रीकांत शिंदे उपस्थित होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर पार्थ पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता पार्थ पवार यांच्या या भेटीमागे नेमकं काय कारण असेल, हे येणाऱ्या काळातच समजेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!