औरंगाबाद : महावितरणकडून गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणला पत्र लिहून कुठलीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांची वीज कापल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला आहे. पिकांना पाणी देण्याच्या हंगाम असतांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर पाण्याविना पिकेही सुकून चाललेली आहेत. आता या विरोधात आमदार प्रशांत बंब(Prashant bumb) येत्या गुरुवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
शासनाकडून महावितरणला शेकडो कोटी रुपयांचे अनुदान हे खास शेतकऱ्यांसाठी दिले जाते. मात्र एवढे अनुदान देऊनही शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संतापलेल्या प्रशांत बंब यांनी महावितरणला तीन पाणी पत्र लिहून उत्तर मागितले आहे. बंब यांनी महावितरण कंपनीकडे राज्य सरकार सोबत झालेले सगळे करार त्याचबरोबर न्यायालय मधून आलेले अनेक आदेश आणि वेळोवेळी संघटना तसेच झालेल्या चर्चांचे सर्व पत्र कागदपत्रे आणि अहवाल देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे.
शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत. आता या विरोधात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी येत्या गुरुवारी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांचाही उद्रेक
गंगापूर तालुक्यात विद्युत रोहित्र बंद करणे या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करणे, अशा स्वरूपाच्या कारवाई महावितरणकडून सुरू आहेत. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा सुद्धा घेतलेला आहे. तत्पूर्वी कायदेशीर बाब म्हणून आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणला हे पत्र पाठवले. या पत्रानंतर महावितरणने जर का समाधानकारक भूमिका नाही घेतली तर कदाचित गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- …असाच चमत्कार २०२४ नंतर दिल्लीत घडवला पाहिजे- छगन भुजबळ
- शिवसेनेने स्वतःचे घर किती गळके आहे ते पाहावे, हा डोलारा लवकरच कोसळेल- मनसे
- ‘मर्यादित षटकांमध्ये भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात’
- शरद पवार म्हणाले, कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी..
- ‘रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

