Share

देवेंद्र फडणवीस यांची ‘मिशन ४८’ ची घोषणा ; आगामी लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार!

Published On: 

मुंबई: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून २ वर्षे बाकी आहेत. भाजपकडून मात्र आतापासुनच या लोकसभा निवडणूकांची तयारी सुरु झाली आहे. भाजप नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एक सूचक विधान केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजप पूर्ण तयारी करत असून, सध्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर विशेष व जास्त लक्ष देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आज मुंबईत भाजप नेत्यांची बैठक पार पडली, यात आगामी लोकसभेच्या निवडणुकांवर चर्चा झाली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिशन ४८’ ची घोषणा केली आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काम कस करायचं, त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यात असलेल्या ४८ पैकी ४८ लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला, त्या ठिकाणी जास्त लक्ष दिले जाईल,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

यावेळी त्यांनी एमआयएम बाबत भाष्य करताना शिवसेनेवरही टीका केली आहे. फडणवीस म्हणाले, “एमआयएमने शिवसेनेला मतदान करून उमेदवाराला निवडून आणलं आहे. एमआयएम शिवसेनेची बी टीम आहे हे सिद्ध झाले आहे. ए टीमला मदत होणारी वक्तव्य इम्तियाज जलील करत आहेत. भाजपा कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. भाजपा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!