🕒 1 min read
नागपूर : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते सत्ताधरी पक्षनेत्यांना टार्गेट करत आहेत. अशातच अशातच काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला असल्याचं समजतं आहे.
काय म्हणाले अतुल लोंढे ?
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पाडून भाजपला सत्तेत आणण्यात आले. त्याचे रिटर्न गिफ्ट म्हणून फडणवीस यांनी महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकणारा प्रकल्प गुजरातला दिला काय?, असा खोचक सवाल करत अतुल लोंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे.काल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
हा प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करावे नाहीतर काँग्रेस राज्यात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही अतुल लोंढे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
तसेच त्यांनी मुख्यमांत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्ला केला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणे ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. परंतु, त्यांनी हजारो युवकांना रोजगार मिळण्याची क्षमता असलेला प्रकल्प घालवून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | उद्योगमंत्री गद्दार, आदित्य ठाकरे वेदांता प्रकल्पावरुन आक्रमक!
- Rupali Thombre Patil | लैंगिक प्रशिक्षण देणाच्या ‘सेक्स तंत्र’ जाहिरातीवर रूपाली ठोंबरे म्हणाल्या…
- Kareena Kapoor Khan | जर तुम्हाला बेबो सारखे फिट दिसायचे असेल तर ‘हा’ व्यायाम फॉलो करा..
- Jio Offer | Jio Fiber चा सर्वात स्वस्त रिचार्ज, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग ‘इतक्या’ रुपयांत उपलब्ध असेल..जाणून घ्या!
- Sanjay Gaikwad | संजय गायकवाड यांना अंबादास दानवे चॅलेंज देणार? ; बुलढाण्यात वातावरण गरम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
