रत्नागिरी : वेदांता–फॉक्सकॉन कंपनीवरुन शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडीत घमासान पहायला मिळत आहे. वेदांता–फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडीकडून कमी प्रतिसाद मिळाला. मागील दोन वर्षात योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कंपनी गुजरात मध्ये गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर याच खापर फोडलं. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रातील उद्याेग गुजरातमध्ये गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राल धोके, असे आदित्य ठाकरे म्हणाले. वेदांता – फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये गेल्याने आरोप- प्रत्यारोपांची मालिका आता राज्यात पाहायला मिळत आहे. आज रत्नागिरी येथील सभेत आदित्य ठाकरे चांगले आक्रमक झाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “गद्दार सरकारने शिवसेनेशी गद्दारी तर केलीच पण त्यांनी महाराष्ट्राशी देखील गद्दारी केली. आता सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहित नाही आहे. निवडणुका लागतील तेव्हा सत्य लोकांसमोर येणार आहे. वेदांता प्रकल्पासाठी त्यांच्या टीमने तळेगाव येथील जागा निवडली होती. १ लाख ५० हजार कोटीची गुंतवणूक होती. एक लाख रोजगार निर्माण होणार होते. यामुळे आम्ही सगळे अनिल अग्रवाल साहेबांशी बोलत होतो भेटत होतो. मात्र नंतर ४० गद्दारांनी गद्दारी करुन सरकार पाळलं. वेदांता प्रकल्पासाठी पाठवरुवठा करायचा असतो तो कमी पडला असेल. हे गुणंतवणूकदार गुजरातला निघून गेले याची मला आज लाज वाटते.”
उद्योगमंत्री कोण आहेत-
यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत, असा सावल आदित्य ठाकरे यांनी केला. यावर जनतेतून गद्दार असा आवाज आला. त्यांनी गद्दारी शिवशेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केली आहे, असे आदित्य म्हणाले. वेदांता प्रकल्प निघून गेला, उद्योगमंत्र्याना विचारलं तर ते म्हणातात माहिती घेऊन सांगतो, असे उद्योगमंत्री होऊ शकतात का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले, मी ३२ वर्षाचा तरुण सरकारमधून बाहेर पडल्यानंतर वेदांता प्रकल्पाबद्दल सांगू शकतो तर मग आताचे उद्योगमत्री का सांगू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Thombre Patil | लैंगिक प्रशिक्षण देणाच्या ‘या’ जाहिरातीवर रूपाली ठोंबरे म्हणाल्या…
- Kareena Kapoor Khan | जर तुम्हाला बेबो सारखे फिट दिसायचे असेल तर ‘हा’ व्यायाम फॉलो करा..
- Jio Offer | Jio Fiber चा सर्वात स्वस्त रिचार्ज, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग ‘इतक्या’ रुपयांत उपलब्ध असेल..जाणून घ्या!
- Sanjay Gaikwad | संजय गायकवाड यांना अंबादास दानवे चॅलेंज देणार? ; बुलढाण्यात वातावरण गरम
- SEX TANTRA | लैंगिक प्रशिक्षण देणाच्या ‘या’ जाहिरातीमुळे पुण्यात उडाली खळबळ


