बुलढाणा : बुलढाण्यात शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या होम ग्राऊंडवर शिवसेनेचा मेळावा आहे. संजय गायकवाड यांनी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आज चॅलेंज देण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात गायकवाड समर्थकांनी राडा केला होता. तेव्हा आक्रमक झालेले अंबादास दानवे आज नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 सप्टेंबर रोजी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्ते आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये यांच्यात राडा झाला होता. या राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संजय गायकवाड यांनी शिवसेनाला धमकी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून चून के, गिन गन के मारेंगे, असं म्हणत त्यांनी शिवसेनाला इशारा दिला आहे.
राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता-
या राड्यामध्ये खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण आज अंबादास दानवे बुलढाण्यात दौऱ्यावर आहेत.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
महत्वाच्या बातम्या :
- Hair Care | ‘हे’ लावल्याने केसातील खाज आणि कोंडा होईल… जाणून घ्या!
- Maharsashtra Rain | पुणे मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
- Atul Londhe | “एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे”
- BJP । आदित्य ठाकरे यांच्या ‘या’ एका चुकीमुळे वेदांता गुजरातला गेला; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा थेट आरोप
- Shivsena । विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पवार हे दिल्लीत असे षड्डू ठोकत आहेत, पण…; शिवसेनेचं दिल्लीतील घडामोडींवर भाष्य


